पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे. धांवतों. तसेंच, आपल्या मालेत ज्याप्रमाणें चंद्र पाहण्यांत येतात त्याप्रमाणें तेथें चंद्र आहेत काय, तेथें ग्रहणें होतात काय, तेथें शेंडेनक्षत्रें पाहण्यांत येत असतील काय, पडणाऱ्या ताऱ्यांचा देखावा तेथें दिसत असेल काय ? याप्रमाणें अनेक प्रश्न आपल्या मनांत येतात खरे; पण त्यांची उत्तरें देतां येतील काय ? अर्थात् बहुतेक अंशीं या प्रश्नांची उत्तरें आज आपणांस देतां येत नाहींत, आणि पुढे तरी देतां येतील असें खात्रीनें सांगतां येत नाहीं. त्या माला आपणांपासून इतक्या दूर अंतरांवर आहेत कीं, त्यांच्याविषयीं इत्थंभूत माहिती जाणण्यास आपणांस कितीहि उत्कट इच्छा झाली, तरी ती माहिती कधींहि प्राप्त व्हावयाची नाहीं. फार तर काय, पण त्या माला दिसत देखील नाहींत ! त्या असाव्यात-खचित असाव्यात–इतकेंच अनुमान मात्र करितां येतें ! काळोख्या रात्रीं तारामय आकाशांत जे अगणित तारे आपण पाहतों, ते आपआपल्या मालेचे प्रचंड सूर्य आहेत. आतां सूर्य हाटला असतां त्याच्या प्रखर तेजाविषयीं ज्या कल्पना आपल्या मनांत येतात, त्या कल्पना तान्यांसंबंधानें प्रथम येत नाहींत हें खरें. पण ह्याचें कारण असें आहे कीं, तारे हे आपणांपासून सूर्यापेक्षां लक्षावधिपट दूर आहेत. समजा कीं, जर एखाद्या मनुष्यास कांहीं अद्भुत शक्तीच्या योगें अंतरिक्षांत प्रवास करण्याचें सामर्थ्य आलें, आणि हा अद्भुत प्रवास करण्याच्या हेतूनें त्यानें सूर्यमालेवरून भरारी