पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. एकंदर विश्वांत या मालेचें आपणांस फारच महत्त्व वाहूं लागतें. ज्या पृथ्वीवर आपण राहतों, ती पृथ्वी सूर्यमालेतील एक ग्रह आहे. आणि ह्मणून आपल्या दृष्टीनें सूर्यमाला ही आपणांस विश्वामध्ये मोठ्या महत्त्वाची वाटते हैं उघड आहे. ही माला विश्वामध्यें आपलें वसतिस्थान होय. बुध, शुक्र, मंगळ, आणि शनि हे आपल्या पृथ्वीचे बंधु होत, आणि चंद्र हा तिचा सेवक होय. सूर्य हा तर तिचा उष्णता, उजेड किंबहुना जीवन देणारा स्वामी आहे. तेव्हां, एकंद- •रींत सूर्यमाला ही आपणांस आपल्या गृहाप्रमाणे फार आव डती आणि महत्त्वाची वाटावी यांत नवल कसचें? आपण आपल्या मालेविषयीं विचार करीत असतां, हिच्यासारख्या दुसऱ्या माला आहेत कीं नाहींत, किंवा हिच्यापेक्षां शेंकडों- पटीनें विस्तीर्ण आणि विलक्षण अशा माला विश्वामध्ये असंख्य आहेत की काय, अशी कल्पना आपल्या मनांत बहुधा येत नाहीं. परंतु आपल्या सूर्यमालेसारख्या दुसऱ्याा अनंत मालांच्या अस्तित्वाविषयीं आपली एक वेळ खात्री झाली कीं त्यांवि- पयीं हजारों प्रश्न मनांत येऊं लागतात. त्या मालांचे सूर्य केवढाले आहेत, हें जाणण्याविषयीं आपण उत्सुक होतों; त्यांत फिरणाऱ्या ग्रहांचे आकार केवढे व कसे आहेत, हें पाहण्याची आपणांस जिज्ञासा होते; आणि तेथें प्राण्यांची वसति असेल काय याविषयीं आपण कल्पना करण्यास