पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ अंतरिक्षांतील चमत्कार. राहण्यास मोठी पंचाईत पडली असती. निदान या प्रकार- च्या पावसापासून रक्षण करण्याकरितां कांहीं विशेष प्रका- रच्या छत्र्या तरी कराव्या लागल्या असत्या ! उल्कांचे मोठमोठ्या वजनांचे दगड पडलेले कधीं कधीं सांपडतात. सन १४९२ या वर्षी जर्मनींत एक मोठा उल्केचा दगड पडला. त्याचें वजन २६० पौंड ( १३० शेर) भरलें. फ्रान्स देशांत सन १८६४ सालीं एक उल्केचा मोठा दगड पडला. हा वरून पडतांना पौर्णिमेच्या चंद्राएवढा मोठा दिसला. परंतु फुटल्यामुळे ह्याचे तुकडे तुकडे होऊन ते पंधरा मैलपर्यंत चोहोंकडे पडलेले सांपडले. सन १८७६ सालीं एप्रिलच्या २० व्या तारखेस इंग्लंडांत पडलेली एक उल्का सांपडली. हिचें वजन ४ शेर होतें. आपल्या मुंबई इलाख्यांत वांई तालुक्यांतील कळंवें गांवीं सन १८७९ सालीं नवंबरच्या ४ थ्या तारखेस सकाळचे नऊ वाजतां एक दगड आकाशांतून पडला. थोडा वेळ तोफांच्या आवाजासार- स्वा गडगडाट होऊन निरभ्र आकाशांतून हा दगड पडतांना एका शेतकऱ्याने पाहिला. ह्या दगडाचें वजन ५ शेर होतें, व रंग काळसर होता. AN