पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पडणारे तारे आणि उल्का. १८७ आपल्या हिंदुस्थानांतहि कलकत्ता व मुंबई येथें उल्कांच्या दगडांचा संग्रह केला आहे. पृथ्वीच्या बाहेर अंतरिक्षांत काय काय पदार्थ आहेत, व आकाशस्थ पदार्थांविषयीं काय काय अनुमानें करितां येतील, याविषयीं प्रत्यक्ष ज्ञान मिळविण्यास हे उल्कांचे दगड मोठे उपयोगी पडतात. कारण हे आकाशांतून पडलेले दगड प्रत्यक्ष हातांत घेऊन त्यांचें पृथक्करण करितां येतें, आणि त्यांत कोणतीं कोणतीं द्रव्यें आहेत हे पहावयास सांपडतें. अनेक प्रयोग करून रसायनशास्त्रवेत्त्यांनीं असें सिद्ध केलें आहे कीं, उल्कांच्या दगडांमध्ये लोखंड, कथील, गंधक, तांबें, शिसें वगैरे पदार्थ असतात. कधीं कधीं मोठमोठ्या उल्का वरतीं हवेंतच फुटतात; आणि त्यामुळे तोफांच्या आवाजासारखे आवाज होऊन पाषाणवृष्टि होते. आकाशांत एकहि ढग नसावा आणि अशा स्वच्छ निरभ्र आकाशांतून गडगडाट होऊन दगडांचा पाऊस पडावा, अशी गोष्ट पुष्कळ वेळां घडून आली आहे. हा दग- डांचा पाऊस कशामुळे पडतो हे माहीत नसल्यामुळे प्राची - नकाळच्या लोकांस हा देखावा अर्थात् मोठा भयप्रद वाटत असे. परंतु प्रस्तुतकाळच्या लोकांस या चमत्काराची मोठी मौज वाटते. या दगडांच्या पावसामुळे कधीं कधीं मनुष्यास इजाहि होते. परंतु असें फारच क्वचित् घडतें ह्मणून बरें; नाहीं तर, या दगडांच्या पावसामुळे आपणांस या पृथ्वीवर