पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पडणारे तारे आणि उल्का. १८५ ! त्यांची वाफ होऊन निघून जाते. त्यावेळेस " हा पहा ! हा पहा ! तारा तुटला !" असें आपण एकदम आश्चर्यचकित होऊन ह्मणतों. आतां हैं लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, जेव्हां पडणारे तारे वातावरणाच्या घर्षणानें तेजस्वी होतात, तेव्हां सर्वांचाच प्रकाश नुसत्या डोळ्यांनी दिसण्याइतका मोठा होतो असें नाहीं; तर कित्येकांचा प्रकाश अगदीं अंधक असतो, आणि ह्मणून तो दुर्बिणीवांचून दिसत नाहीं. काळो- ख्या रात्रीं दुर्बिणींतून पहात असतां एकदम प्रकाशाची अंधक पट्टीच्यापट्टी पाहण्यांत येते. पडणाऱ्या ताऱ्यांचें हें दुर्बिणींतून मात्र दिसणारें तेज होय. लक्षपूर्वक अवलोकन केलें असतां दररोज रात्रीं २०/२५६ तरी पडणारे तारे नजरेस पडतील. परंतु वर्षांतून कांहीं कांहीं रात्रीं नेहमींच्यापेक्षां पुष्कळ असे तारे पडतांना दृष्टीस पडतात. याविषयीं ज्योतिष्यांचें असें मत आहे कीं, पडणा- या ताऱ्यांचे थवेच्याथवे सूर्याभोवती फिरत असतात. यांपैकीं कांहींचे मार्ग पृथ्वीच्या कक्षेच्या आडवे आले आहेत. ह्मणून यांची व आपल्या पृथ्वीची भेट कधीं कधीं होते. त्यामुळे कांहीं विशेष रात्रीं पडणाऱ्या ताऱ्यांचा विल- क्षण देखावा पाहण्यांत येतो. याप्रमाणे पडणाऱ्या ताऱ्यांचा ५०/६० थव्यांचा शोध आजपर्यंत लागला आहे. यांपैकी एक मोठा थवा पृथ्वीला आगस्ट महिन्यांत ९ पासून ११ तारखांच्या सुमाराला भेटतो, आणि दुसरा थवा नोवें-