पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ अंतरिक्षांतील चमत्कार. बर महिन्यांत १२ पासून १४ तारखांच्या सुमाराला भेटतो. हे थवे जेव्हां पृथ्वीच्या जवळ येतात, तेव्हां त्यांतील कांहीं तारे पृथ्वीच्या आकर्षणानें ओढले जाऊन त्यांची स्थिति वर सांगितल्याप्रमाणे होते. ह्मणून आगस्ट व नोवेंबर या महि न्यांत कांहीं रात्रींस पुष्कळ तारे पडतांना दृष्टीस पडतात. अशा थव्यांपैकी एक पुंजका फारच मोठा आहे. त्यास सूर्याभोंवतीं फिरण्यास सुमारें ३३ वर्षे लागतात. ह्मणून तो जेव्हां ३३ वर्षांनीं एकवेळ पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हां तारे इतके पडतात कीं, त्यावेळेस तान्यांचा केवळ पाऊस पडत आहे असे वाटतें. हा विलक्षण देखावा सन १८६६ सालीं पहाण्यास सांपडला. आणि आतां लवकरच सन १८९९ साली तसला सुंदर देखावा आपल्या दृष्टीस पडेल. ज्यांनीं असला देखावा अद्यापपर्यंत पाहिला नसेल, त्यांस हा देखावा कसा असतो याची कांहींशी कल्पना ३५ व्या आकृतीवरून करितां येईल. पडणारे तारे जर फारच लहान असले, तर वातावरणा- च्या घर्षणानें त्यांची वाफ होऊन ते वरच्यावर हवेंतच नाहींसे होतात. पण जे कांहींसे मोठे असतात, ते पूर्णपणें नाहींसे होण्याच्या पूर्वीच पृथ्वीवर येऊन पडतात. यांस 'उल्का' किंवा 'आकाशांतून पडलेले दगड' असें ह्मणतात. पृथ्वीवर असे पडलेले दगड जमवून ते यूरोपांतील व अमे- रिकेंतील मोठमोठ्या पदार्थसंग्रहालयांत ठेविले आहेत.