पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ अंतरिक्षांतील चमत्कार. - पदार्थ सूर्याभोवती फिरत राहील. याप्रमाणें कोट्यानकोटी पडणारे तारे सूर्याभोंवतीं फिरत आहेत, आणि जर त्यांस कोठूनहि अडथळा होणार नाहीं, तर ते तसेच निरंतर फिरत राहतील. हे तारे इतके लहान आहेत कीं, दुर्बीण कितीहि मोठी असली, तरी ते तसल्या दुर्बिणींतून देखील अंतरिक्षांत फिरतांना दिसत नाहींत. मग एरवीं कोठून दिसणार ? असें जरी आहे, तरी या ताऱ्यांचे अस्तित्व आपणांस मोठ्या चमत्कारिक रीतीनें कळून येतें. तें असेंः- हे तारे सूर्याभोंवतीं मोठ्या वेगानें फिरत असतां, आपल्या पृथ्वीच्या आकर्षणानें ओढले जाऊन पृथ्वीवरच्या वातावर णांत मोठ्या वेगानें शिरतात. आपणांस हे कळले आहे की, पृथ्वीच्या सभोवती दोन तीनशें मैलपर्यंत हवा जाळ्यासार- खी पसरली आहे. पृथ्वीच्या आकर्षणाच्या तडाक्यांत जर पडणारा तारा सांपडला नाहीं, तर तो सूर्याभोंवतीं फिरत राहून आपणांस कधींहि दिसावयाचा नाहीं. परंतु, असें न होतां जर तो पृथ्वीचे आकर्षणानें ओढला जाऊन वातावर णाच्या जाळ्यांत सांपडेल, तर मग मात्र त्याचें आयुष्य संपलेंच ह्मणावयाचें. कारण, हे तारे सूर्याभोंवतीं मोठ्या वेगानें-दर सेकंदांत २० मैल या मानानें- फिरतात. त्यामुळे इतक्या झपाट्यानें जेव्हां हे आपल्या हवेंत घुसतात, तेव्हां घर्षणानें ते प्रथम तापून लालभडक होतात, नंतर पांढरे शुभ्र होऊन वितळूं लागतात, आणि शेवटीं लक्कन् चमकून