पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पडणारे तारे आणि उल्का. १८३ विस्तार लक्षावधि मैलपर्यंत गणिला जातो अशीं शेंडेनक्षत्रें, हीं सर्व पडणाऱ्या ताऱ्यांपेक्षां अनंतपटीनें मोठी आहेत; इतकेंच नव्हे, तर ज्यांना लघुग्रह अशी यथार्थ संज्ञा दिली आहे ते लघुग्रह देखील पडणाऱ्या ताऱ्यांशी ताडून पाहतां आपणांस मोठे प्रचंड वाटतील ! इतके सूक्ष्म हे पडणारे तारे आहेत. पडणारे तारे आकारानें जरी लहान आहेत, तरी त्यांची संख्या अतोनात मोठी आहे. एखादा तरी तारा पडल्यावां- चून एक मिनिट सुद्धां जात नाहीं. दररोज पृथ्वीवर १४ हजार कोटि तारे पडतात असे गणित करून विद्वान् ज्योति- प्यांनी सिद्ध केले आहे. यावरून हे तारे एकंदर किती कोटि असतील हें अर्थात् सांगतां येणार नाहीं. यांपैकीं कांहीं तारे पुष्कळ शेर, कदाचित् पुष्कळ खंडींपर्यंत देखील वजनांत भरतील. परंतु बाकीचे बहुतेक तारे बोरांपेक्षांहि मोठे नसतात. आणि कित्येक तर इतके लहान असतात कीं, त्यांचें वजन दोन तीन गुंजांपेक्षांहि अधिक नसतें ! हे सूक्ष्म पदार्थ सूर्याभोंवतीं मोठ्या ग्रहांप्रमाणे फिरत असतात. यावरून हें उघड आहे कीं, आकाशस्थ पदार्थ अत्यंत सूक्ष्म असोत किंवा मोठे असोत, ते सर्व एकाच नियमानुरोधानें सूर्याच्या अंकित राहून त्याभोंवतीं फिरत असतात. जसा एखादा मोठा गौल सूर्याभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो, तसाच एखादा लहान गोटीएवढाहि