पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ अंतरिक्षांतील चमत्कार. त्या धूमकेतूच्या सहा शेंड्यांनीं लोक किती भिऊन गेले असतील ! सन १६८० सालीं एक मोठें शेंडेनक्षत्र दृष्टीस पडलें होतें. हें सूर्याच्या इतकें जवळ गेलें होतें कीं, त्यावरून गणित करून प्रख्यात ज्योतिषी न्यूटन यानें असें अनुमान केलें कीं, या शेंडेनक्षत्रास सूर्याभोंवतीं एक फेरा करण्यास सुमारें ८८१४ वर्षे लागतील! ह्मणजे हें शेंडेनक्षत्र इ० स० १०४९४ या वर्षी पुनः मानवी प्राण्यांस दृष्टीस पडेल ! सन १८४४ सालीं जें शेंडेनक्षत्र पाहण्यांत आलें, त्याविषयीं गणितानें असे काढलें आहे कीं, या शेंडेनक्षत्रास पुनः सूर्याकडे येण्यास एक लक्षाहूनहि अधिक वर्षे लागतील! हें गणित जर कदाचित् बरोबर असेल तर या शेंडेनक्षत्राचें दर्शन इ० सन १०१८४४ या सालीं जे मनुष्यप्राणी असतील त्यांस होणार ! हा एक लक्ष वर्षांचा प्रदक्षिणाकाळ जर खरा असेल, तर सूर्यापासून ४०० अब्ज मैलपर्यंत दूर अंतरालांत हें शेंडे- नक्षत्र जात असावें असें होईल ! प्राचीन काळीं शेंडेनक्षत्र दिसणें ह्मणजे मोठें दुश्चिन्ह आहे असें लोक समजत असत. अद्यापहि कित्येक देशांत अ समजतात कीं, शेंडेनक्षत्र आकाशांत दिसूं लागलें ह्मणजे राजास कांहीं अनिष्ट येणार आहे, किंवा राज्यक्रांति होणार आहे, किंवा दुष्काळ पडणार आहे, आणि त्याचें हें सूचक आहे. आपल्या देशांतहि पुष्कळ लोकांची समजूत अशीच आहे.