पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेंडेनक्षत्रें. १७७ डोळ्यांनी दिसत नाहीं. दुर्बिणीने मात्र दिसते. यास शेंडी नाहीं व डोकेंहि नाहीं. धुक्याच्या गोळ्यासारखें हें दिसतें. ह्यॉलेच्या शेंडेनक्षत्रास सूर्याभोंवतीं फिरण्यास सुमारें ७५।७६ वर्षे लागतात. या शेंडेनक्षत्राच्या प्रदक्षिणेचा काळ ह्याले या नामांकित इंग्लिश ज्योतिष्यानें गणित करून काढिला. ह्मणून यास ह्यॉलेचें शेंडेनक्षत्र ह्मणतात. हें शेंडेनक्षत्र सन १८३५ सालीं दृष्टीस पडलें होतें. आतां सन १९९० सालीं ह्मणजे आजपासून सुमारे १५ वर्षांनीं हें दृष्टीस पडेल. याची कक्षा एका बाजूस इतकी लांब गेली आहे कीं, सूर्य- मातील अत्यंत शेवटला ग्रह जो नेप्च्यून त्याच्या कक्षे- च्याहि पलीकडे दूर हें शेंडेनक्षत्र जातें. जेव्हां हें शेंडेनक्षत्र सूर्यापासून अत्यंत दूर जातें, तेव्हां तें ३ अब्ज २० कोटि मैल अंतरावर असतें; आणि जेव्हां सूर्याच्या अगदी जवळ येतें, तेव्हां फक्त १३ कोटि मैल दूर असतें ! सन १७४४ सालीं जें शेंडेनक्षत्र दृष्टीस पडत होतें त्याचें चित्र ३२ व्या आकृतींत दाखविलें आहे. या रोडेनक्षत्रास ६. शेंड्या होत्या. इतक्या शेंड्यांचें दूसरे नक्षत्र पूर्वी कधीं दृष्टीस पडले नव्हते. निदान याविषयीं विश्वसनीय असा कांहीं लेख आढळून येत नाहीं. या सन १७४४ च्या ६ शेंड्यांच्या धूमकेतूचा देखावा त्या वेळच्या लोकांस मोठा भयप्रद वाटला असेल यांत शंका नाहीं. आजला सुद्धां शेंडेनक्षत्राच्या एकाच शेंडीनें पुष्कळांस किती भीति वाटते ! मग १५० वर्षांपूर्वी १२