पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ अंतरिक्षांतील चमत्कार. शेंडींतूनहि पलीकडचे तारे स्पष्ट दृष्टीस पडतात. परंतु १००/२०० फुटांच्या जाडीच्या ढगांनीं तारेच काय पण आपला प्रचंड सूर्य देखील आच्छादिला जाऊन दिसेनासा होतो. यावरून ढगांपेक्षांहि शेंकडोंपट-हजारोंपट-विरल अशा द्रव्यांची शेंडेनक्षत्रें व त्यांच्या शेंड्या बनलेल्या आहेत हे सिद्ध होतें. क्षत्र ह्मणतात. आतां कांहीं शेंडेनक्षत्रांविषयीं थोडीशी माहिती सांगून हा भाग पुरा करूं. कित्येक शेंडेनक्षत्रांच्या कक्षा व प्रदक्षिणेचा काळ हीं कळलीं आहेत. एंकीचें शेंडेनक्षत्र हे त्यांपैकी एक आहे. एंकी या नांवाच्या प्रसिद्ध ज्योतिष्यानें एक धूम- केतु दुर्बिणीच्या साह्यानें शोधून काढिला, व सूर्याभोंवतीं त्याची एक प्रदक्षिणा होण्यास किती काळ लागतो हें वर्त- विलें. ह्मणून यास एंकीचा धूमकेतु किंवा एंकीचें शेंडेन- या शेंडेनक्षत्राची कक्षा चांगली कळली आहे. त्यावरून याच्या प्रदक्षिणेचा काळ समजला आहे. सूर्याभोंवतीं फिरण्यास या शेंडेनक्षत्रास सुमारें ३३ वर्षे लागतात. एंकीच्या शेंडेनक्षत्राची कक्षा एका बाजूस गुरूच्या कक्षेच्या जवळ जवळ गेली आहे, व दुसऱ्या बाजूस बुधाच्या कक्षेच्याहि आंत सूर्याचे जवळ जवळ आली आहे. ह्मणून हें शेंडेनक्षत्र सूर्यापासून अत्यंत दूर असतें, तेव्हां ३८ कोटि ७० लक्ष मैलांवर असतें; आणि सूर्याचे जवळ येतें, तेव्हां फक्त ३ कोटि २० लक्ष मैलांवर असतें. हें शेंडेनक्षत्र नुसत्या