पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेंडेनक्षत्रें. त्यांवरील विरल द्रव्यें सूर्याच्या उष्णतेनें जळून त्यांचा धूर कित्येक मैलपर्यंत एकसारखा अंतरिक्षांत वाहत जातो. हें अ- नुमान जर खरें असेल, तर प्राचीन हिंदु ज्योतिष्यांनीं शेंडेनक्षत्रास 'धूमकेतु' (धुराची पताका धारण करणारा आ- काशस्थ पदार्थ ) असें जें नांव दिलें तें अगदी यथार्थ आहे. शेंडेनक्षत्रांच्या कक्षा—सूर्याभोवती फिरण्याचे मार्ग-- हांच्या कक्षांपेक्षां अत्यंत दीर्घवर्तुलाकार आहेत. कांहींच्या कक्षा तर इतक्या दीर्घवर्तुलाकार आहेत कीं, एकवेळ सूर्याजवळ येऊन परत गेल्यावर पुनः सूर्याकडे येण्यास त्यांस हजारों, लक्षा- वधि, वर्षे लागावींत असें अनुमान निघतें; आणि कित्येक तर फिरून सूर्याकडे मुळींच येऊं शकणार नाहींत असें ह्मणतात. ज्या शेंडेनक्षत्रांच्या कक्षा कळल्या आहेत तीं शेंडेनक्षत्रें एकवेळ फिरून गेल्यावर पुन्हां सूर्याकडे केव्हां येतील हें बहुतेक निश्चितपणें सांगतां येतें. शेंडेनक्षत्रांवरील पदार्थ कोणत्या स्थितीत आहेत यावि- षयीं विद्वानांचीं भिन्न भिन्न मतें आहेत. तथापि, इतकें खरें आहे कीं, शेंडेनक्षत्रें ग्रहांप्रमाणे जड नाहींत; तीं फार हलकीं व विरल आहेत. ग्रहांचें, उपग्रहांचें, आणि सूर्याचें वजन काढितां येतें. परंतु कांहीं केलें तरी शेंडेनक्षत्रांचें वजन काढितां येत नाहीं. यावरून शेंडेनक्षत्रें हीं ज्या पदार्थांचीं झालेलीं आहेत, ते पदार्थ अत्यंत विरल असावेत हैं उ आहे. तसेंच, शेंडेनक्षत्रांच्या कित्येक हजार मैलपर्यंत जाड अशा