पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ अंतरिक्षांतील चमत्कार. त्रांस शेंडी मुळींच नसून डोकें मात्र असतें. आणि कांहींस तर शेंडी नसते व डोकेहि नसतें. धुक्याचा गोलाकार झालेला भाग जसा दिसावा तशीं हीं शेंडेनक्षत्रें दिसतात. ज्यांस शेंडी नसते, आणि ज्यांस शेंडी व डोकेंहि नसतें, अशीं शेंडेनक्षत्रें दुर्बिणींतून मात्र दिसतात, एरवीं दिसत नाहींत. शेंडेनक्षत्राच्या शेंडीचा एक चमत्कार आहे. ही शेंडी सूर्याच्या उलट दिशेस नेहमीं फिरलेली असते. ती कशी असते हें ३४ व्या आकृतींत दाखविले आहे. प्रथम जेव्हां शेंडेनक्षत्र दृष्टीस पडूं लागतें, तेव्हां त्याची शेंडी अगदी लहान असते, किंवा मुळींच नसते असें ह्मटलें तरी चालेल. परंतु जसजसे शेंडेनक्षत्र सूर्याच्या जवळ जवळ येऊं लागतें, तसतशी ही शेंडी वाढत वाढत जाते, आणि पुढे वाढतां वाढतां लक्षावधि मैल लांब होते ! सन १६८० त जें शेंडेनक्षत्र दिसलें, त्याची शेंडी ११ कोटि १२ लक्ष मैल लांब होती. ३१ व्या आकृ- तींत दाखविलेल्या सन १८११ तील शेंडेनक्षत्राच्या शेंडीची लांबी १० कोटि मैल होती, असें प्रख्यात ज्योतिषी हर्शल यांचें मत होतें. सूर्याच्या जवळ येऊन त्याला वळसा घालून जेव्हां शेंडेनक्षत्र परत जाऊं लागतें, तेव्हां त्याची शेंडी कमी कमी होत जाते. आणि शेवटीं जसें तें शिखाहीन अशा स्थितींत प्रथम दृष्टीस पडतें तसें तें शिखाहीन होऊन आपणांस दिसेनासें होतें. यावरून असें अनुमान काढिलें आहे कीं, शेंडेनक्षत्रें हीं जसजश सूर्याच्या जवळ येऊं लागतात, तसतशीं