पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेंडेनक्षत्रें. वेगाच्या पेक्षां २०००० पट अधिक असतो. आणि कधीं कधीं तर सूर्याच्या जवळील भागांत एका सेकंदांत ३००/३५० मैल जाण्याइतकी यांची गति वाढते. सूर्यापासून परत जा तांना शेंडेनक्षत्रांची गति मंद मंद होत जाते. ती इतकी कीं, शेवटीं शेवटीं एका सेकंदांत फक्त ९।१० फुट जाण्याइतकी गति त्यांच्यांत उरते; जणूं काय सूर्याच्या जवळील प्रदेशांत अत्यंत वेगानें चालल्यामुळे हीं शेंडेनक्षत्रे अगदी थकून जातात, आणि त्यांच्यानें पुढें दर सेकंदांत ९११० फुटांपेक्षां अधिक प्रवास करवत नाहीं ! सन १८११ सालीं जें मोठें शेंडेनक्षत्र दिसत होतें त्याचें चित्र ३१ व्या आकृतींत दाखविलें आहे. या आकृतीवरून शेंडेनक्षत्राचा सामान्य आकार कसा असतो हे लक्षांत येईल. या आकृतींत जो तेजस्वी लहानसा भाग दिसतो, त्यास शेंडेनक्षत्राचें डोकें किंवा शेंडेनक्षत्राचा तारा असें ह्मणतात- या डोक्यासभोंवतींच कांहींसें कमी तेजस्वी अशा थरांचें एक पटल असतें. आणि त्यापासूनच शेंडेनक्षत्राची शेंडी फुटलेली असते. शेंडीचा भाग अत्यंत विरल व हलका असतो. या आ कृतींत दाखविलेला आकार सर्वच शेंडेनक्षत्रांचा असतो असे नाहीं. शेंडेनक्षत्रांच्या आकृति नानाप्रकारच्या चमत्कारिक असतात, हें नुकतेंच सांगितले आहे. कांहीं शेंडेनक्षत्रांस तीन तीन चार चार व त्यांहूनहि अधिक शेंड्या असतात. ( आ- कृति ३२ वी व आकृति ३३ वी पहा.) कित्येक शेंडेनक्ष-