पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १४. -०८:0:00 शेंडेनक्षत्रें, किंवा धूमकेतु. आतांपर्यंत ग्रह व उपग्रह या आकाशस्थ जड पदार्थांचें वर्णन केलें. हे ग्रह आणि त्यांचे उपग्रह गोल असून, ध्रुवां- कडे कांहींसे कमीजास्त चपटे झालेले दृष्टीस पडतात. यांच्या कक्षा व गति नियमित आहेत. आज अमुक ग्रह कोठें दृष्टीस पडेल इतकेंच निश्चितपणे सांगतां येतें असें नव्हे; तर तो ग्रह एक महिन्यापूर्वी किंवा शंभर वर्षांपूर्वी कोठें होता, आणि पुढे शंभर किंवा हजार वर्षांनीं कोठें असेल, हेंहि गणित करून खात्रीपूर्वक अगोदर वर्तवितां येतें. परंतु शेंडे- नक्षत्रें किंवा धूमकेतु असें ज्या आकाशस्थ पदार्थांस ह्मणतों, त्यांचे सर्वच काहीं विलक्षण ! ते ग्रहांहून अत्यंत