पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ अंतरिक्षांतील चमत्कार. भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत. कित्येक शेंडेनक्षत्रे आकाशांत अकस्मात् आपल्या दृष्टीस पडतात. हीं कोठून आलीं हे कळत नाहीं, वहीं कोणीकडे जाणार हेंहि समजत नाहीं. एक वेळ आपल्या सूर्याजवळ येऊन त्याला वळसा घालून पुन्हां हीं परत गेलीं व एकदां अंतरिक्षांत अंतर्धान पावलीं, ह्मणजे पुन- रपि हीं मनुष्यजातीच्या कधींहि दृष्टीस पडावयाचीं नाहींत. कांहीं शेंडेनक्षत्रें अशीं आहेत कीं, एक फेरा सूर्याभोवत केल्यावर तीं कांहीं वर्षे मात्र आपणांस दिसत नाहींत. आणि जेव्हां तीं पुनः दुसरा फेरा करण्याकरितां सूर्याकडे येतात, तेव्हां तीं फिरून आपल्या दृष्टीस पडतात. धूमकेतूंच्या आकृति नाना तऱ्हेच्या असतात. कांहींच्या आकृति पाहतां पाहतां सुद्धां मोठ्या विलक्षण रीतीनें बदलतात. अशा एकाद्या शेंडेनक्षत्राचें चित्र काढण्यास जर एकादा चितारी बसला, तर त्याचें चित्र पुरें झालें न झालें तोंच तें शेंडेनक्षत्र अगदीं निराळ्या आकृतीचें दिसूं लागेल ! अशा चमत्कारिक प्रका- रचे हे पदार्थ आहेत. अत्यंत दूर अशा अंतरिक्षाचे प्रदेशांत प्रवास करीत असतां सूर्याच्या आकर्षणानें ओढलीं जाऊन हीं शेंडेनक्षत्रे सूर्याकडे येऊं लागतात. प्रथम यांची गति फारच मंद असते; परंतु जसजशीं हीं सूर्याच्या जवळ येऊं लागतात, तसतशी त्यांची गति अधिक अधिक होत जाते. सूर्याच्या जवळ यांची गति इतकी मोठी होते कीं, तिचा वेग आगगाडीच्या