पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेपच्यून. १६९ याप्रमाणे सध्यां ग्रहांचें व उपग्रहांचें माहीत असलेल्या सूर्यमालेतील सर्व आह्मीं वर्णन केलें. नेप्च्यूनच्याहि पलीकडे एखादा ग्रह सूर्यमालेत आहे की नाहीं, हे अद्याप - पर्यंत समजलें नाहीं; आणि, असा एखादा अज्ञात ग्रह असेल अशी कल्पनाहि करण्यास अजून कारण दिसून आलें नाहीं. सूर्यमालेचें वर्णन संपविण्यापूर्वी आणखी दोन प्रकारच्या जड पदार्थांविषयीं वर्णन करणें अवश्य आहे. कारण, ग्रह आणि उपग्रह यांशिवाय शेंडेनक्षत्रे आणि उल्कातारे हीं सूर्याच्या अंकित असून त्याच्याभोंवतीं सूर्यमालेत फिरत असतात. तेव्हां, आतां शेंडेनक्षत्रें आणि उल्कातारे यांच्या- विषय माहिती पुढील दोन भागांत दिली जाईल.