पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेपच्यून. झाल्यामुळे, हा अति दूरचा ग्रह शोधून काढल्याचे यश फ्रान्स देशाला मिळालें." या रीतीनें नेप्च्यून या ग्रहाचा शोध लागला. जो ग्रह आपणांपासून कोट्यावधि मैल दूर, जो ग्रह कोणांसहि माहीत नाहीं, इतकेंच नव्हे, तर जो ग्रह असेल कीं नाहीं याचीच शंका पुष्कळांस होती, त्या ग्रहाचें अस्तित्व ठरवून तो ग्रह किती मोठा आहे, त्याचें वजन किती आहे, तो युरेनस ग्रहाला कसकसा ओढितो, आणि तो कोणत्या वेळेस कोठें किती अंतरावर आहे, हे सर्व काढणें - आणि तेंहि दुर्बिणीनें आकाशांत वेध घेऊन नव्हे, तर घरांतल्या खोलींत वसून केवळ गणित करून काढणें - हें काम किती कठिण, किती कुशलतेचें, किती चातुर्याचें, आणि किती शांतपणानें विचार करण्याचें आहे हे सांगतां येणें अशक्य आहे. याची कल्प- नाच केली पाहिजे. असा विलक्षण शोध लाविल्यावरून लीव्हेरियर या बुद्धिवान् पुरुषाचें नांव ज्याच्या त्याच्या तोंडीं झालें, आणि त्याच्या बुद्धिवैभवाचें सर्वांनीं कौतुक केलें हैं साहजिक आहे. नेपच्यून हा ग्रह नुसत्या डोळ्यांनी कधींच दिसत नाहीं. मोठ्या दुर्बिणींतून सुद्धां हा चांगला दिसत नाहीं. याचें बिंब किंचित् मोठें मात्र दिसतें. युरेनस ग्रहावरीलहि खाणाखुणा जर आपणांस दिसत नाहींत, तर जो ग्रह युरेन- साचेहि पलीकडे १००।१२१ कोटि मैल दूर असणार, त्या