पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. होती तितकी तफावत युरेनसाच्या स्थितीत पडण्यास युरेन- साच्या पलीकडे तो अज्ञात ग्रह किती अंतरावर असला पाहिजे, व त्याचें आकारमान किती असले पाहिजे, ह्या गोष्टींचा विचार आकर्षणाच्या नियमांच्या अनुरोधानें ज्योतिषी करूं लागले. इंग्लंड देशांत केंब्रिज येथें मि० आडम्स ह्या नांवाचा ज्योतिषी होता, व फ्रान्स देशांत मोशो लीव्हे- रियर नांवाचा ज्योतिषी होता. ते उभयतां हा प्रश्न सोड- विण्याकरितां बसले. बहुत वर्षे श्रम केल्यानंतर तो प्रश्न एकदांचा सुटला, आणि त्या अज्ञात ग्रहाचा शोध लागला. त्याचा प्रकार असाः - तेव्हां लीव्हेरियर ह्याजवळ मोठी दुर्बीण नव्हती, ह्मणून त्यानें आपला मित्र डॉक्टर ग्याले ह्यास बर्लिन येथें असें पत्र पाठविलें कीं, हें पत्र पोंचतांच अमुक स्थळ आकाशांत आपल्या मोठ्या दुर्बिणींतून आपण पहावें, ह्मणजे आपल्या आकर्षणाच्या योगानें युरेनसाच्या गतींत अनियमितपणा उत्पन्न करणारा ग्रह आपणास दिसेल. त्याप्रमाणें डॉक्टर ग्याले यानें पाहिले तेव्हां हा ग्रह सांप- डला. ह्या ग्रहाचें प्रथमतः दर्शन ता० २३ सप्टंबर १८४६ इ० रोजीं डॉ० ग्याले ह्यास झालें. लीव्हेरियर ह्यानें गणि- ताच्या मदतीनें ह्या अज्ञात ग्रहाचें जें स्थळ ठरविलें होतें, व मि० आडम्स ह्यानें जें ठरविलें होतें त्यांत फारच थोडी तफावत होती. तरी लीव्हेरियरचा शोध अगोदर प्रसिद्ध