पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. नेपच्यून ग्रहावरील खाणाखुणा आपणांस कशा दिसाव्यात ? ह्मणून नेप्च्यून आपले आंसावर फिरतो कीं नाहीं हें अद्याप समजलें नाहीं. नेपूच्यूनचा व्यास ३५००० मैल आहे. आ कारानें हा ग्रह पृथ्वीपेक्षां सुमारें १०५ पट मोठा आहे. परंतु याचें वजन पृथ्वीच्या सारें २१ पट आहे. यावरून असें अनु मान काढिलें आहे कीं, नेप्च्यूनवरील पदार्थ आपल्या येथील पदार्थांपेक्षां फारच हलके आहेत. आणि गुरु, शनि, व युरे- नस या ग्रहांप्रमाणेच नेप्च्यूनचा पृष्ठभाग ढगांच्या दाट थरांनीं वेष्टित आहे. या ग्रहाचें सूर्यापासून मध्यम अंतर २ अब्ज ७६ कोटि ४० लक्ष मैल आहे. जेव्हां हा ग्रह सूर्यापासून अति दूर जातो, तेव्हां याचें अंतर ३ अब्ज मैलांहूनहि अधिक असतें ! आपणांपासून हा ग्रह सुमारें २ अब्ज ७० कोटि मैल दूर आहे. त्यामुळे दुर्बिणींतून देखील हा फक्त आठव्या प्रतीच्या ताज्याप्रमाणे लहान दिसतो. याचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग १७ अब्ज मैल लांब आहे; ह्मणजे सूर्याभोंवतीं एक फेरा करण्यास या ग्रहास १७ अब्ज मैलांचा प्रवास करावा लागतो. इतका प्रवास नेप्च्यून १६५ वर्षांत करितो. याप्र- माणे एका तासांत १२४६० मैल लांब जाण्याची गति पृथ्वी- च्या १०५ पट मोठा असणाऱ्या या ग्रहाच्या अंगीं आहे, हें पाहून आपणांस फार आश्चर्य वाटते. हा वेग आगगाडी- च्याहि वेगापेक्षां तीनशें चारशेंपटीनें मोठा आहे !