पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेप्च्यून. ज्योतिषी लीव्हेरियर यास केवढें बुद्धिचातुर्य खर्चावें लागलें हेंहि वाचकांस कळून येईल. नेप्च्यूनच्या शोधाविषय हकीकत बालबोध या मासिक- पुस्तकांत थोडक्यांत फार सुंदर रीतीनें दिली आहे. ती अशीः – “युरेनस ग्रहाचा शोध इ० स० १७८१ ह्या वर्षी हर्शल ह्यानें लाविल्यावर ज्योतिष्यांनी त्याचे वेध घेऊन, गणितानें, त्याची गति आणि कक्षा ह्यांचा निर्णय केला. पुढे त्या निर्णयानुरूप तो विवक्षित काळी आपल्या कक्षेत विवक्षित स्थळीं दिसतो कीं नाहीं, हें ते पाहूं लागले. तों तो निर्णीत स्थळीं दिसेना, आणि आपल्या गणितांत कांहीं चूक आहे कीं काय, हें ते तपासून पाहतां त्यांतहि त्यांस चूक आढळेना. ह्मणून निर्णीत स्थळीं युरेनस कां दिसत नाहीं, याचा विचार करीत असतांना, ज्योतिष्यांच्या मनांत असें आलें कीं, युरेनसाच्या कक्षेच्या पलीकडे ज्याची कक्षा आहे असा एखादा सूर्याभोंवर्ती फिरणारा दुसरा ग्रह असून त्यानें युरेन- साला आकर्षिल्यामुळें, तो, विवक्षित कार्की, आपण गणितानें ठरविलेल्या स्थळीं स्वकक्षेत दिसत नाहीं असें तर होत नसे- लना? कारण, ह्या अज्ञात ग्रहाच्या आकर्षणाचा जो परिणाम युरेनसावर होण्याचा संभव आहे, तो आपण आपल्या गणि- तांत जमेस धरिलेला नाहीं. अशी अटकळ ज्योतिष्यांनीं केल्यानंतर गणितानें ठरविलेलें स्थळ आणि युरेनस खरोखर विवक्षित काळ जेथें दिसतो तें स्थळ, ह्यांमध्यें जितकी तफावत