पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ अंतरिक्षांतील चमत्कार. ओढण्याची शक्तिहि जबर असल्यामुळे पृथ्वी ही आ- पल्या कक्षेत बहुतेक व्यवस्थेशीर व नियमानें फिरत असते. तथापि बाकीच्या ग्रहांचें आकर्षण अगदींच निर्फळ होत नाहीं; आणि या ग्रहांच्या आकर्षणामुळे कधीं किंचित् या बाजूला, कधीं किंचित् त्या बाजूला, याप्रमाणें पृथ्वी आपल्या कक्षेत नागमोडीसारखी फिरत असते. याचप्रमाणे सर्व ग्रहांस आप- आपल्या कक्षेत फिरत असतां बाकीच्या ग्रहांपासून थोडी- बहुत ओढाताण सोसावी लागते. आतां यावरून हे उघड होतें कीं, ग्रहांस जर केवळ एकट्या सूर्याचेंच आकर्षण असतें, तर त्यांच्या कक्षा कांहींशा तरी भिन्न झाल्या असत्या. तेव्हां, कोणत्याहि ग्रहाची कक्षा व गति हीं बरोबर समजण्यास त्या ग्रहावर सूर्याचें आकर्षण किती चालतें इतकेंच समजून उपयोग नाहीं; तर दुसऱ्या सर्व ग्रहांचें व इतर पदार्थांचें त्याच्यावर किती आकर्षण होत असतें, व त्याचा परिणाम काय होतो, हेंहि समजणें अवश्य आहे. आतां हें जें आह्मींवर गुरुत्वाकर्षणाविषयीं सांगितलें तें ध्यानांत धरून, नेप्च्यून याचा शोध कशा रीतीनें लाविला याविषयींची हकीकत जी आतां आह्मी देणार आहों, ती वाचली असतां या ग्रहाच्या शोधाचें खरें महत्त्व सहज कळून येईल. तसेंच, नेप्च्यूनचा शोध लावण्यास युरेनस ग्रह कसा कारण झाला, आणि हा नवीन शोध करण्यास फ्रेंच गणिती व