पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेपच्यून. १६१ वस्तु दुसऱ्या प्रत्येक वस्तूस आपणाकडे ओढीत असते. तेव्हां प्रत्येक ग्रह फक्त सूर्यानेंच ओढिला जातो असें नाहीं, तर ग्रहावर दुसऱ्या असंख्य पदार्थांचें आकर्षण सतत चाललें असतें, आणि ग्रहांच्या फिरण्याचा जो मार्ग बनतो, तो सर्व ह्या आकर्षणाचा परिणाम होय. आपल्या सूर्यमालेतील ग्रह वगैरे पदार्थांवर, अंतरालांत जे असंख्य तारे दिसतात, त्यांचेंहि आकर्षण कांहीं तरी होत असले पाहिजेच. परंतु तारे इतके दूर आहेत आणि त्यामुळे त्यांचें आकर्षण आपल्यावर इतकें सूक्ष्म होत असतें कीं, तें आकर्षण मुळींच जमेस धरिलें नाहीं तरी चालेल. तेव्हां सूर्यमालेत सूर्याचें व ग्रहांचें परस्परांवर जें आकर्षण चालले आहे, त्याचाच मात्र विचार करणें अवश्य आहे. पृथ्वीस सूर्याचें आकर्षण जितके आहे, तितकें दुसरें कशाचेंहि नाहीं. ह्मणून पृथ्वीची कक्षा मुखत्वेंकरून सूर्या- च्या आकर्षणानें नियमित झाली आहे. असें जरी आहे, तरी सर्व ग्रह पृथ्वीस एकसारखे आपआपल्याकडे ओढीत अस तातः जणूं काय सूर्यमालाकुंटुंबांतील लोकांत एकसारखा कलहच माजून राहिला आहे ! कधीं गुरु पृथ्वीस आपल्या कडे दोन तीन हजार मैल ओढितो, आणि कधीं शुक्र तिला आपल्याकडे शेंदोनशें मैल ओढितो. मंगळ, शनि, आणि दुसरे ग्रह हेहि पृथ्वीला आपआपल्या अंत- रांच्या आणि आकारांच्या मानानें ओढीत असतात. परंतु सूर्य सर्वांत अत्यंत मोठा असल्यामुळे, आणि त्याची , ११