पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य. पृथ्वीसारखा जंड गोळा झालेला नाहीं. आणि ह्मणूनच, पृथ्वीपेक्षां आकारानें सूर्य जरी सुमारें बारा तेरा लक्ष मोठा आहे, तरी वजनांत तो त्या मानानें तितका न भरतां कमी भरतो. जर प्रचंड तराजूच्या एका पारड्यांत सूर्याचा गोळा ठेविला, तर समतोल होण्याकरितां दुसऱ्या पार- ड्यांत ३२४००० पृथ्व्या घालाव्या लागतील ! ह्मणजे सूर्याचें वजन आपल्या पृथ्वीच्या सुमारें सव्वातीन लक्षपट आहे. , सूर्यावर प्रचंड उष्णता असल्यामुळे आपणांस इतक्या दूर ९ कोटि २७ लक्ष मैलांवर उजेड व उष्णता हीं मिळत आहेत. आतां, आहे त्यापेक्षां जर सूर्य दूर जात जात अगदी जवळचे ताऱ्यांइतका दूर गेला, तर तो आपणांस लहानशा तान्याएवढा दिसेल, किंवा कदाचित् दिसणारहि नाहीं! मग, त्यापासून उष्णता व उजेड हीं आपणांस मिळा- वयाचें नांवच नको. तान्यांइतका दूर सूर्य गेला असतां तो मध्यमशा ताज्यासारखा दिसेल, हें जर खरें आहे, तर तारे आपल्या सूर्यासारखेच तेजस्वी सूर्य आहेत हें उघड झालेंच. रात्री जे कोट्यावधि तारे आपणांस दिसतात, ते आपल्या सूर्यासारखे, आणि कित्येक तर सूर्यापेक्षांहि प्रचंड सूर्य आहेत असें मानिलें तर त्यांच्या भोंवतीं फिरणाऱ्या मोठमोठ्या ग्रह- मालाहि असल्या पाहिजेत हे उघड आहे. तेव्हां, असे असंख्य प्रचंड सूर्य व त्यांच्या विलक्षण ग्रहमाला यांनी परि-