पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. S सूर्य हा प्रचंड आगीचा गोळा आहे. तेथें इतकी उष्णता आहे कीं, तशी उष्णता पृथ्वीवर कांहींहि केल्यानें आज आपणांस उत्पन्न करितां येणार नाहीं. १०० (सेंटिग्रेड ) उष्णता झाली कीं, पाण्याची वाफ होते, हे सर्वांस माहीत आहेच. ११३ अंशांवर गंधक वितळू लागतो, आणि २३५° वर जस्त, ३२५° वर शिसें, ९४५ वर रुपें, १२४५° वर सोनें, १५००° प्लाटिनम् ही धातु, व १९५०° इरि- डियम्, याप्रमाणे पदार्थ वितळू लागतात. रसायन शाळेत कृत्रिम उष्णता २५००° पासून ३००० पर्यंत मात्र उत्पन्न करितां येते. परंतु, ही कृत्रिम उष्णता सूर्याचे उष्णतेपुढें कांहींच नाहीं ! सूर्यावर उष्णता किती अंश आहे किंवा असावी–हें मोजण्याचे प्रयत्न अलीकडे मोठमोठ्या विद्वान् रसायनशास्त्रज्ञांनी चालविले आहेत. परंतु, सर्वांचें याविषयीं एक मत अद्याप झाले नसल्यामुळे सूर्याची उष्णता बरोबर किती अंश आहे हे सांगतां येत नाहीं. रॉसेटी याचें मत सूर्याची उष्णता १००००° असावी असें आहे, हिर्न ह्मणतो २ लक्ष अंश; सॉरेट ह्मणतो ५ लक्ष अंश; वॉटरसन झणतो ७ लक्ष अंश; आणि सेची ह्मणतो १ कोटि अंशपर्यंत १ सूर्याची उष्णता असावी ! तेव्हां यावरून इतकें मात्र निःसं- शय सिद्ध होतें कीं, सूर्यावर अतिशय उष्णता आहे. इतकी अत्यंत उष्णता असल्यामुळे सूर्यगोलाचीं घटक द्रव्यें अजून वायुरूपी आहेत. ह्मणून, सूर्य हा अद्याप आपल्या