पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ अंतरिक्षांतील चमत्कार. पूर्ण भरलेलें जें हें अनंत विशाल विश्व याची कल्पना तरी आपणां पामरांस कशी व्हावी ? यावरून असें ठरतें कीं, सूर्य हा एक तारा आहे, आणि तोहि ह्मणजे मोठ्या महत्वाचा तारा आहे असें नाहीं. आपला सूर्य आणि त्याची ती प्रचंड सूर्यमाला, हीं सर्व जरी विश्वांतून नाहींशीं झाली, तरी, विश्वांतला एक लहानसा तारा चमकण्याचा नाहींसा झाला, इतकेंच मात्र वाटेल; याप- रतें विशेष कांहींएक वाटणार नाहीं ! विश्वाशीं तोलून पाहतां सूर्य अगदींच क्षुल्लक पदार्थ दिसतो. तरी, ज्या पृथ्वीवर आपण राहतों, त्या पृथ्वीचें अस्तित्वच ज्यावर अवलंबून आहे, आणि प्राणिमात्रांच्या जीवितास अत्यंत आवश्यक अशी उष्णता व उजेड हीं ज्यापासून मिळतात, त्या सूर्याचें महत्व आपणांस विशेष वाटावें हें साहजिक आहे. यास्तव, या भागांत आह्मीं जी माहिती देत आहों ती विश्वांतल्या एका क्षुद्र तान्याची नव्हे, तर, ती माहिती आपली पृथ्वी ज्या मालेत आहे, त्या प्रचंड मालेचा नियंता व स्वामी याची आहे हे विसरतां कामा नये. सूर्य नुसत्या डोळ्यांनीं आपणांस एखाद्या सपाट वर्तुळासारखा दिसतो. परंतु, तो तसा नाहीं. तो एक अत्यंत मोठा तेजस्वी आगीचा गोळा आहे. आणि त्याचा अर्धा भाग आपणांकडे वळलेला असतो. ह्मणून, तो सपाट वर्तुळासारखा दिसतो.