पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. सांगणें आवश्यक आहे. कां कीं त्याशिवाय नेप्च्यूनच्या शोधाचें खरें महत्त्व वाचकांच्या मनांत बरोबर बिंबणार नाहीं. यास्तव, आकर्षणाविषयीं कांहीं माहिती आतां सांगतों. आकर्षणाचा सार्वत्रिक नियम असा आहे कीं, विश्वांतील लहानमोठे सर्व पदार्थ एकमेकांस एकमेकांकडे ओढीत अस तात. हें पदार्थांचें परस्परांवर होत असलेलें आकर्षण त्यांच्या आकारावर आणि अंतरावर अवलंबून असतें; ह्मणजे जितका पदार्थ मोठा तितकें त्याचें आकर्षण अधिक, जितका पदार्थ लहान तितकें त्याचें आकर्षण कमी; आणि जितकें त्याचें अंतर जास्त तितकें त्याचें आकर्षण कमी, जितकें त्याचें अंतर कमी तितकें त्याचें आकर्षण अधिक. या नियमानुरूप सूर्य, ग्रह, उपग्रह वगैरे सूर्यमालेतील सर्व जड पदार्थ हे एकमेकांस सतत ओढीत असतात. सूर्याचें आकर्षण सर्व ग्रहांवर चालतें इतकेंच नव्हे, तर सर्व ग्रहांचें व उपग्रहांचें आणि इतर पदार्थांचें आकर्षण सूर्यावरहि होत असतें. आतां सूर्य इतका मोठा आहे कीं, सूर्यमालेतील सर्व ग्रह व सर्व उपग्रह हे जरी एके ठिकाण केले, तरी तो त्यांपेक्षां शेंकडोंपटीनें मोठा येईल. ह्मणून आपल्या सूर्यमालेतील ग्रह वगैरे सर्व पदार्थांस दावांत ठेवणारी मुख्य शक्ति अर्थात् सूर्य होय. ह्या शक्तीमुळें- सूर्याच्या आकर्षणामुळे ग्रहांस सूर्याभोंवतीं दीर्घवर्तुलाकार कक्षेत फिरावें लागतें. एकट्या सूर्याचेंच आकर्षण ग्रहांवर चालतें असें नाहीं; आकर्षणाच्या नियमाप्रमाणें ह्मटलें ह्मणजे प्रत्येक