पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १३. नेपूच्यून. युरेनस या ग्रहाचा शोध लागल्यामुळे सूर्यमालेचा विस्तार पूर्वीपेक्षां पुष्कळ वाढला यांत शंका नाहीं; परंतु युरेनसाचेहि पलीकडे फिरणारा असा एक नवीन ग्रह सांपडून सूर्यमालेचा विस्तार याहूनहि पुष्कळ वाढला आहे. या नवीन नेप्च्यून ग्रहाचा शोध फारच विलक्षण व चमत्कारिक रीतीनें लागला. यासारखा विलक्षण शोध ज्योतिषशास्त्राच्याच इतिहासांत काय, पण कोणत्याहि शास्त्राच्या इतिहासांत पाहूं गेलें असतां सांपडणें विरळा. नेप्च्यूनच्या शोधाची एकंदर सर्व हकीकत वाचली ह्मणजे मन आश्चर्यानें अगदीं थक्क होऊन जातें, आणि ज्या विद्वान् पुरुषांनीं आपल्या बुद्धिसामर्थ्यानें हें महत्कृत्य केले त्यांस आपण धन्य धन्य ह्मणतों. नेपच्यूनचा शोध कोणीं कशा विलक्षण रीतीनें लाविला हैं सांगण्यापूर्वी प्रथम आकर्षण याविषयीं कांहीं माहिती