पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ अंतरिक्षांतील चमत्कार. या दोन नवीन ग्रहांचे आकार आपल्या पृथ्वीपेक्षा किती मोठे आहेत, हैं वाचकांच्या लक्षांत येईल. हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणे सूर्याभोंवतीं दीर्घवर्तुळाकार मार्गानें फिरतो. त्यामुळे हा कधीं कधीं सूर्यापासून फार जवळ ह्मणजे १ अब्ज ६७ कोटि ८० लक्ष मैल अंतरावर असतो, आणि कधीं कधीं फार दूर ह्मणजे १ अब्ज ८४ कोटि ४७ लक्ष मैलांवर असतो. ह्मणून या ग्रहाचें सूर्यापासून मध्यम अंतर १ अब्ज ७६ कोटि ३० लक्ष मैल असतें असें समजतात. आपणांपा- सून हा ग्रह सुमारे १५८ कोटि मैलांपासून १७५ कोटि मैलांपर्यंत दूर असतो. इतक्या दूर अंतरावर असल्यामुळे हा ग्रह अर्थात् दुर्बिणीवांचून क्वचितच दिसण्यांत येतो. युरेनसाभोंवतीं फिरणारे चार चंद्र सांपडले आहेत. यांतील पहिला चंद्र २३ दिवसांत आणि चवथा चंद्र १३३ दिवसांत युरेनसाभोवती फिरतो. हे चंद्र चांगल्या दुर्बिणींतून मात्र दिसतात; एरवीं दिसत नाहींत. सूर्यमालेतील सर्व पदार्थांचे सूर्याभोंवतीं फिरण्याचे मार्ग कमीअधिक दीर्घवर्तुलाकार आहेत, अगदीं वर्तुलाकार असे नाहींत. परंतु युरेनस याचे चंद्र वर्तुलाकार मार्गानें फिरतात हें विसंगत दिसतें खरें; असें कां असावें याविषयीं कांहीं अनुमान करितां येत नाहीं. सर्व उपग्रह मुख्य ग्रहांभोंवतीं पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. परंतु युरेनसाचे उपग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात; हेंहि विसंगत दिसतें, व याचेंहि कारण काय असावें हें अद्याप समजलें नाहीं. ,