पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युरेनस. १५७ याचीं. तेव्हां युरेनस या ग्रहावरील एक वर्षाचें मूल आणि आपल्या येथील ८४ वर्षांचे वृद्ध आजोबा हीं दोघेंहि वयानें सारखींच ! हा आपल्या पृथ्वीपेक्षां हा ग्रह जरी आकाराने मोठा आहे, तरी वजनांत तो तितका मोठा येत नाहीं. कारण, गुरु व शनि या दोन ग्रहांप्रमाणेंच मेघांच्या दाट थरांनी हा ग्रह पृष्ठभागीं फुगलेला दिसतो. यावरून युरेनसावरील पदार्थ येथील पदार्थांपेक्षां हलके आहेत असें होतें. हा ग्रह निळ- सर दिसतो. या ग्रहाचे पृष्ठभागावर पट्टे किंवा दुसऱ्या कांहीं खाणाखुणा चांगल्या दिसत नाहींत. ह्मणून आपल्या फिरतो कीं नाहीं, हें अद्याप समजलें नाहीं. तरी सर्व ग्रहांप्रमाणे युरेनसहि आपल्या आंसावर फिरत असावा यांत शंका नाहीं. युरेनसाचा व्यास ३३३०० मैल आहे, ह्मणजे या ग्रहाचा व्यास आपल्या पृथ्वीच्या व्यासापेक्षां चौपटीहून अधिक आहे असे दिसून येतें. हा ग्रह गुरु व शनि या ग्रहांहून जरी लहान आहे, तरी याचा आकार आपल्या पृथ्वीच्या ६९ पट मोठा आहे. आणि याचें वजन आपल्या पृथ्वीच्या १३३ पट आहे. सूर्यमालेंतील ग्रहांचे सापेक्ष आकार समजून यावेत ह्मणून २९ व्या आकृतींत हे आकार दाख- विले आहेत. या आकृतीवरून हर्शल या प्रसिद्ध ज्योति- प्यास सांपडलेला युरेनस, व युरेनसामुळें लिव्हेरियर व आडम्स यांनीं विलक्षण रीतीनें शोधून काढलेला जो नेप्च्यून,