पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युरेनस. १५५ दूर आहेत कीं, दुर्बिणीची शक्ति कितीहि मोठी असो, त्यांचीं विवें दुर्बिणींतून सुद्धां किंचित् देखील मोठीं दिसत नाहींत; मात्र ते अधिक तेजस्वी दिसतात. यावरून हर्शल यास असें साहजिक वाटलें कीं, मिथुनराशींतील तारे पाहत असतां ज्याचें बिंब मोठेंसें दिसलें तो तारा नसावा, तर सूर्य- मार्लेतीलच एखादा जड पदार्थ असावा. कारण, सूर्यमालेंत जे पदार्थ येतात, ते आपणांस तान्यांपेक्षां अत्यंत जवळ आहेत; तेव्हां अर्थात् हे पदार्थ दुर्बिणींतून पाहिले असतां एरवींच्या- पेक्षां मोठे दिसतात. यास्तव ज्याचें विंव दुर्बिणींतून मोठें दिसतें, तो एक ग्रह तरी असावा, किंवा फार झालें तर धूम- केतु असावा; परंतु तो तारा असूं शकणार नाहीं. प्रथम हर्शल यास तर असे वाटलें कीं, आपण जो तारा ह्मणून पाहिला आणि ज्याचें बिंब मोठें दिसलें तो धूमकेतुच असावा. धूम- केतु ( शेंडेनक्षत्र ) ह्मटल्याबरोबर आपल्या मनांत असें येतें कीं या जातीच्या आकाशस्थ पदार्थाला लहान किंवा मोठी शेंडी असलीच पाहिजे. परंतु कांहीं धूमकेतु असे आहेत कीं त्यांस शेंडी मुळींच नसते; आणि असले शिखानष्ट धूमकेतु बहुधा दुर्बिणीवांचून दिसत नाहींत. तेव्हां आपण जो आका- शस्थ जड पदार्थ पाहिला, तो धूमकेतु आहे असें हर्शल यास प्रथम वाटणे साहजिक होतें. आपल्या हातून एका नवीन मोठ्या ग्रहाचा शोध लागला आहे असे त्या वेळीं हर्शल याच्या ध्यानींमनींहि नव्ह्तें. पुढें कांहीं दिवस या नवीन दिसलेल्या