पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. पदार्थाचे सूक्ष्म वेध घेतल्यावर याची गति धूमकेतूच्या गती- हून भिन्न दिसलीः ह्मणून हा धूमकेतु नसून सूर्यमालेतीलच एक ग्रह आहे असे सर्व ज्योतिषी लोकांनीं ठरविलें. आणि इतके दिवस मनुष्यजातीस अज्ञात असा हा नवीन ग्रह शोधून काढल्यावरून हर्शल याची चोहोंकडे मोठी ख्याति झाली. याप्रमाणें युरेनस या ग्रहाचा शोध लागला. याविषयीं जों जों विचार करावा तों तों या शोधाचें महत्त्व विशेष वाटू लागतें. पृथ्वीशिवाय बाकीचे पांच ग्रह फार प्राचीन काळापासून लोकांस माहीत होते; कारण कीं ते ग्रह आपणांस नुसत्या डोळ्यांनीं दिसतात. परंतु, हर्शल यानें असें दाखविलें कीं, बुध, शुक्र व पृथ्वी यांच्यापेक्षांहि अनेक पटीनें मोठा व पूर्वी माहीत अ सलेल्या ग्रहांच्या फार पलीकडे असा एक ग्रह आहे. हा ग्रह जरी मोठा आहे तरी हा सूर्यापासून इतक्या अंतरावर आहे कीं, हर्शल याला हा लहानशा तान्याएवढा दिसला. युरेनसाचा शोध लागल्यामुळे सूर्यमालेचा विस्तार ९२/९३ कोटि मैलांपासून १ अब्ज ८४ कोटि मैलांपर्यंत वाढला ! युरेनस हा सहाव्या प्रतीच्या ताज्याइतका तेजस्वी आहे. हा ग्रह आकाशांत कोठें आहे हें जर माहीत असेल, तर तीक्ष्ण दृष्टीच्या लोकांस हा ग्रह कधींकधीं दुर्बिणीवांचूनहि दृष्टीस पडतो. याची सूर्याभोंवतीं एक प्रदक्षिणा पुरी होण्यास ८४ वर्षे लागतात ! युरेनसाचें एक वर्ष ह्मटलें ह्मणजे आपलीं ८४ वर्षे व्हाव-