पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ अंतरिक्षातील चमत्कार. ळेंच नेप्च्यूनचा शोध लागला असें ह्मणण्यास कांहीं प्रत्य- वाय नाहीं. • युरेनस ग्रहाचे शोधाविषयींची हकीकत अशी आहे:- वुइलियम् हर्शल ह्या नांवाचा एक सुप्रसिद्ध ज्योतिषी यूरो- पांत गेल्या शतकांत होऊन गेला. हा मूळचा जर्मनींत ह्यानो- वर प्रांतांतला राहणारा होता. कांहीं कारणामुळे तो इंग्लंड देशांत बाथ या शहरीं येऊन राहिला. यास ज्योतिषशास्त्राची फार आवड असे. परंतु हा गरीब असल्यामुळे दुर्बीण विकत घेण्याची यास शक्ति नव्हती. तेव्हां त्यानें एक चांगली दुर्बीण स्वतःच करण्याचें मनांत आणिलें. दुर्बिणीचीं भिंगे तयार करण्याचें काम खरोखर मोठें कुशलतेचें आणि कठीण आहे. त्यांतून हर्शल हा या कामांत अगदीं नवखा मनुष्य पडला. तरी त्यानें आपला दृढनिश्चय कायम ठेवून मोठ्या परिश्रमानें एक मोठी दुर्बीण तयार केली. ही दुर्बीण इतकी चांगली झाली कीं, त्या वेळेस हर्शलच्या दुर्बिणीप्रमाणे मोठी दुर्बीण कोणाजवळहि नव्हती. या स्वतः केलेल्या दुर्बिणींतून तारे वगैरे पाहून त्यांचा सूक्ष्म वेध घेण्याचा क्रम हर्शल यानें सन १७७४ साली सुरू केला. सन १७८१ या वर्षी मार्च महिन्याचे १३ वे तारखेस रात्रीं मिथुनराशींतील तारे एक एक सूक्ष्म रीतीनें पाहत असतां, हर्शल यास त्यांतील एका ताऱ्याचें बिंब किंचित् मोठें झलिसें दिसलें. आतां आपणांस हें माहीत आहे कीं तारे ह्मणून जितके आहेत, ते सर्व इतके