पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १२. युरेनस. येथपर्यंत आह्मीं प्राचीन लोकांस माहीत असलेल्या ग्रहां- विषयीं विचार केला. १८ वे शतकापर्यंत लोक असे समजत असत कीं, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु व शनि इतकेच ग्रह सूर्यमालेत असून शनीची कक्षा हीच सूर्यमालेची मर्यादा आहे. परंतु अलीकडे युरेनस व नेप्च्यून या दोन नवीन ग्रहांचा शोध लागल्यापासून सूर्यमालेची मर्यादा पूर्वीपेक्षां तिपटीहून अधिक वाढली आहे. पूर्वीच्या लोकांनी सूर्यमालें- तील अत्यंत शेवटला मानलेला जो शनिग्रह, तो सूर्यापासून ९२।९३ कोटि मैलांपर्यंत दूर जातो; आणि नवीन सांपड- लेला नेप्च्यून हा ग्रह सूर्यापासून कधीं कधीं ३०० कोटि मैलांहूनहि अधिक अंतरावर असतो. यावरून हल्लीं सूर्यमा- लेचा केवढा विस्तार आपणांस समजला आहे याचें अनुमान करितां येईल. प्रथम युरेनस ग्रह सांपडला, आणि युरेनसामु