पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शनि. १५१ हे अनंत तारे इतके दूर आहेत कीं, ते स्पष्ट निरनिराळे दिसत नाहींत, तर ह्या ताऱ्यांच्या जमावानें आपणांस आकाश- गंगेसारखा पट्टा दिसतो. दुर्बिणींतून पाहिलें असतां हा पट्टा असंख्य ताऱ्यांचा झाला आहे असे समजून येतें. कांहींसें याच नमुन्यावर या शनीभोंवतीं फिरणाऱ्या असंख्य चंद्रांची तीन कडीं झालेलीं दिसतात. जसा असंख्य ताज्यांमुळे आका शगंगेचा पट्टा दिसतो, त्याप्रमाणेंच सूक्ष्म असंख्य चंद्रांमुळे शनीभोंवतीं हीं सुंदर कडीं दिसतात. शनीवर जर आपणांस जातां येईल तर किती विलक्षण चमत्कार पहाण्यास सांपडतील, त्याविषयीं येथून आपणांस कल्पनाहि करितां येणार नाहीं. शनीचीं तीं तीन अद्भुत कडीं, आठ चंद्रांची माला, व त्यांचा चमत्कारिक देखावा, हीं सर्व पाहून आश्चर्यानें कोण थक्क होणार नाहीं !