पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य. साधारण कल्पना आपणांस करितां येईल. एक, दोन, तीन, अशा रीतीनें दर सेकंडास एक, याप्रमाणे १० लक्ष आंकडे मोजण्यास आपणांस बारा दिवसांहून अधिक वेळ लागेल! तेव्हां, सूर्याचे अंतराइतके – ह्मणजे ९ कोटि २७ लक्ष- आंकडे मध्यें न थांबतां एकसारखे मोजण्यास आपणांस साडेतीन वर्षे लागतील! आतां खुद्द सूर्यापर्यंत जाऊन पोंचण्यास आपणांस किती काळ लागेल याविषयीं थोडासा विचार करूं, ह्मणजे सूर्य आपणांपासून किती दूर आहे हे चांगलें लक्षांत येईल. दर तासास ४० मैल ह्या वेगानें जाणाऱ्या आगगाडीस सूर्याइतकें अंतर चालण्यास २५० हून अधिक वर्षे लागतील! समजा कीं, मराठ्यांचें राज्य स्थापन करणारे शिवाजीमहा- राज यांचे वेळेस (इ० स० १६२७ - ८० ) जरी आगगाडी सूर्यावर जाण्याकरितां निघाली असती, आणि मध्ये एक पळ- भरहि न थांबतां रात्रंदिवस तशीच एकसारखी चालली असती, तरी ती आजला सुद्धां सूर्यावर जाऊन पोंचली नसती ! जर एखादा मनुष्य पृथ्वीवरून सूर्याकडे जाण्यास आगगाडीं- तून निघाला तर तो स्वतः जाऊन पोंचण्याची तर आशा नाहींच; पण, त्याच्या पणतूचा पणतू कदाचित् पोंचेल ! आगगाडीनें येथून सूर्यापर्यंत प्रवास करण्याचें मनांत आणिलें, तरी इतका काळ लागतो. मग बैलगाडीनें किंवा पायांनीं प्रवास करावयाचा ह्मटल्यास किती वर्षे लागतील हे सांगा- वयास नकोच.