पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० अंतरिक्षांतील चमत्कार. शनीला आणखी तिसरें कडें आहे असें कळले नव्हतें. सन १८५० सालीं प्रोफेसर बाँड यांनीं शनीच्या तिसऱ्या कड्याचा शोध लाविला. हीं तिन्हीं कडीं शनीभोंवतीं सुमारें १० तास २२ मिनिटें १६ सेकंद इतक्या वेळांत एक फेरा करितातः ह्मणजे जसा चंद्र पृथ्वीभोंवतीं फिरतो, किंवा मंगळ, गुरु इत्यादि ग्रहांचे चंद्र जसे आपापल्या ग्रहांभोंवतीं फिरतात, त्याप्रमाणे हीं कडीं शनीभोवती फिरतात. सर्वांत बाहेरचें कडें शनीच्या मध्यबिंदूपासून सुमारें ८५ हजार मैलांच्या अंतरावर आहे. तेव्हां, हीं तिन्हीं कडीं मिळून सर्वांची रुंदी सरासरी २८ हजार मैल येईल. ह्या कड्यांची जाडी १०० मैलांपेक्षा अधिक नसेल असें ह्मणतात. शनीचीं 'कडीं कशाचीं आहेत याविषयीं ज्योतिषी लोकांत अद्यापि एक मत झालें नाहीं. तरी शनीभोंवतीं असंख्य अत्यंत लहान लहान चंद्र फिरत आहेत, आणि हे सूक्ष्म चंद्र अगदीं एक- मेकांजवळ असून एकामागून एक असे सारखे ओळीनें फिर- तात, आणि त्यामुळे ही असंख्य चंद्रांची माला आपणांस कड्यांप्रमाणे दिसते, असे प्रख्यात प्रॉक्टर ज्योतिषी यांनीं सिद्ध केले आहे. प्रॉक्टरचें मत खरें आहे असें आतां बहुतेक युरोपांतील व अमेरिकेंतील विद्वान् ज्योतिषी समजतात. ज्या अंतरालांतील पट्ट्यास आपण आकाशगंगा ह्मणतो तो पट्टा काय आहे ? लक्षावधि - कोट्यावधि-तारे मिळून हा पट्टा झाला आहे याविषयीं आतां कोणास तरी शंका आहे काय?