पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शनि. १४९ आतां, ज्या विलक्षण कड्यांच्या योगानें शनीनें सूर्यमालें- तील इतर ग्रहांस लाजविलें आहे, आणि ज्या कड्यांमुळे शनीला ज्योतिषशास्त्रांत इतकें महत्त्व आले आहे, त्या कड्यांविषयीं थोडासा विचार करून हा भाग पुरा करूं. नुसत्या डोळ्यांनीं शनि फक्त गोल दिसतो. परंतु दुर्बिणींतून पाहिले असतां, शनीभोंवतीं तीन तेजोमय विलक्षण कडीं आहेत असे आपल्या नजरेस पडतें. हीं कडीं २७ व्या व २८ व्या आकृतींवरून समजून येतील. शनिग्रहाचा गोल मध्यभागीं असून त्याभों- वतीं हीं कडीं अंतरालांत अधांत्री अलग आहेत; शनीच्या गोलाला चिकटलेलीं नाहींत. ह्या तीन कड्यांपैकीं बाहेरील दोन कडीं तेजस्वी दिसतात, आणि तिसरें आंतील कडें अंधक दिसतें. बाहेरील दोन कडीं एकमेकांस सोडून आहेत. त्यामुळे त्यांच्यामधून आकाशांतील पोकळीचा निळा भाग स्पष्टपणे दिसण्यांत येतो. तिसरें जें कडें आहे, तें मधल्या कड्यास अगदीं सोडून झालें आहे असें नाहीं; तर मधल्या कड्याच्या आतील बाजूसच लागून ह्या अंधक कड्याचा प्रारंभ झाला आहे असे पहाण्यांत येतें. हें तिसरें कडें अत्यंत पातळ व पारदर्शक आहे. त्यामुळे यांतून ग्रहाचा गोल स्पष्ट- पणे दृष्टीस पडतो. बाहेरील दोन कडीं साधारण प्रतीच्या दुर्बिणींतूनहि दृष्टीस पडतात. परंतु आंतलें तिसरें कडे पाह- ण्यास मोठ्या शक्तीचीच दुर्बीण लागते. सन १८५० पर्यंत बाहेरील दोनच कडीं लोकांस समजलीं होतीं. तोपर्यंत