पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ अंतरिक्षांतील चमत्कार. शनीचें सूर्यापासून मध्यम अंतर ८७ कोटि ६७ लक्ष मैल आहे. कधीं कधीं हा ग्रह सूर्याचे अति जवळ जातो, त्या वेळेस देखील तो सुमारें ८२ कोटि २६ लक्ष मैलांवर असतो; आणि ज्या वेळेस तो सूर्यापासून अति दूर जातो, त्या वेळेस ९२ कोटि ५८ लक्ष मैलांवर असतो. या ग्रहाचा व्यास पूर्वपश्चिम ७४००० मैल आहे, आणि दक्षिणोत्तर ६८००० ● मैल आहे. यावरून हा ग्रह उत्तर व दक्षिण ध्रुवांकडे बराच चपटा झाला आहे असे आढळून येतें. गुरूप्रमाणें या ग्रहाचाहि चपटेपणा दुर्बिणींतून सहज समजण्यांत येतो. या ग्रहाभोंवतीं फिर आठ उपग्रह - किंवा चंद्र आहेत असा शोध लागला आहे. पहिला चंद्र शनीचे मध्यबिंदूपासून १ लक्ष १८ हजार मैल अंतरावर आहे आणि शेवटला ह्मणजे आठवा चंद्र २२ लक्ष ६० हजार मैल दूर आहे. हे आठहि चंद्र जेव्हां एकाच वेळेस शनीवरील लोकांस पाहण्यास सांपडत अस तील, तेव्हां त्यांना किती मौज व आश्चर्य वाटत असेल बरें ? एक चंद्र पूर्ण आहे, तर दुसण्याची द्वितीयेच्या चंद्रासारखी कोर आहे; तिसरा अष्टमीच्या चंद्राप्रमाणें दिसतो, तर चवथा शुद्ध द्वादशीच्या चंद्राप्रमाणें पहाण्यांत येतो; पांचवा नुकताच उगवत आहे, तर सहावा अस्तास चालला आहे; सातव्यास ग्रहण लागले आहे, तर आठव्याचें ग्रहण सुटत चालले आहे. याप्रमाणे प्रत्येक चंद्राचा विस्मयकारक देखावा शनीवर कधीं कधीं एकाच समयीं पहाण्यांत येत असेल !