पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शनि. १४७ यावरून असें ह्मणावें लागतें कीं, शनि ह्मणून जो ग्रह आपण आकाशांत पाहतों तो भरींव गोल नाहीं, तर आंतील उष्ण भागाभोंवतीं विस्तीर्ण व दाट अशा ढगांचें एक वेष्टन आहे, आणि त्याचा हा ग्रह बनला आहे. शनीच्या पृष्ठभागावर आडवे पट्टे दिसतात. परंतु, हे पट्टे गुरूवरील पट्टयांप्रमाणे सरळ आडवे नसून बरेच बांकदार अस तात. (आकृति २८ वी पहा.) हे पट्टे ढगांचे आहेत असे समजून आले आहे. या पट्ट्यांच्या खुणांवरून असें काढिलें आहे कीं, हा ग्रह आपले आंसावर १० तास १४ मिनिटें आणि १३ सेकंद इत- क्या वेळांत एक फेरा करितो; ह्मणजे शनीवरील एक दिवस आपल्या एक दिवसाच्या निम्याहूनहि कमी आहे. गुरूवरील दिवसरात्रीप्रमाणे शनीवरीलहि दिवस सुमारें पांच तासांचा व रात्रहि पांच तासांचीच ! पूर्वीच्या लोकांस माहीत असलेल्या ग्रहांपैकीं या ग्रहास सूर्याभोवती फिरण्यास सर्वांहून अधिक काळ लागतो, ह्मणून या ग्रहास ' शनैश्चर' – मंद चालणारा - असें आपले लोक पूर्वीपासून ह्मणत आले. सूर्याभोंवतीं एक प्रदक्षिणा करण्यास शनीला २९ वर्षे ५ महिने १६ दिवस लागतात. याप्रमाणे शनीचें एक वर्ष आपल्या २९ ३० वर्षांएवढे असल्यामुळें तेथें पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे सर्व ऋतु प्रत्येक दहा दहा वर्षे असतात ! शनीचा एक दिवस पांच तासांचा, ऋतु दहा वर्षांचा आणि वर्ष २५००० दिवसांचें ! काय हें सृष्टिवैचित्र्य !