पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ११. शनि. प्राचीन लोकांस माहीत असलेल्या ग्रहांपैकी शेवटला ग्रह जो शनि त्याविषयीं आतां आपण या भागांत विचार करूं. गुरुग्रहावरून निघून शनीवर येऊन पोंचावयास आपणांस सुमारें ४० कोटि मैल प्रवास करावा लागेल; ह्मणजे गुरूपा- सून शनि ४० कोटि मैल अंतरावर आहे, आणि तितकी या दोन ग्रहांमधील सूर्यमालेतील जागा रिती आहे. गुरूपेक्षां शनि जरी लहान आहे, तरी दुर्बिणींतून या ग्रहाभोंवतीं जीं तेजोमय तीन कडीं आणि आठ चंद्रांची माला दृष्टीस पडते, तो सुंदर देखावा पाहून आपणांस अत्यंत आश्चर्य वाटतें. शनिग्रहासारखा देखावा सूर्यमालेतच काय, पण अंतरालांतील दुसऱ्या कोणत्याहि भागांत आपल्या पाहण्यांत येत नाहीं. तेव्हां ज्याला म्हणून दुर्बिणींतून पाहण्याची संधि मिळते, तो प्रथम शनीचें दर्शन घेण्यास अर्थात् अत्यंत उत्सुक असतो. १०