पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ अंतरिक्षांतील चमत्कार. णांस या क्षणीं जो सूर्य दिसतो, तो आठ मिनिटांपूर्वी जसा होता तसा दिसतो ! जरी सूर्य एकदम विश्वांतून नाहींसा झाला, तरी तो पुढें आठ मिनिटांपर्यंत आपणांस तसाच दिसत राहील ! चाप्रमाणें प्रकाशास गति आहे व ही गति एका सेकंदांत १ लक्ष ८६ हजार मैल जाण्याइतकी प्रचंड आहे - हा सुंदर शोध प्रथम गुरूच्या चंद्रग्रहणांवरून लावण्यांत आला, ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. गुरूच्या पांच चंद्रांमुळे रात्रीचा देखावा फारच रमणीय व चित्तवेधक वाटून तेथील लोकांस मोठा आनंद होत असेल यांत संशय नाहीं. आपल्या येथें पृथ्वीवरील एखाद्या उंच एकांत स्थलावरून रात्री ११।१२ वाजतां चंद्रोदय झाल्यावर सृष्टीची सुंदर शोभा पाहण्याची किती मौज असते ! चोहों- कडे अगदी शांत आहे आणि दूर अंतरालांतून शीतल व मनोहर चंद्रकिरणांचा वर्षाव एकसारखा चालला आहे, हें पाहून सर्व विश्व आनंदमय भासूं' लागते आणि सहृदय मनु- प्याचें अंतःकरण शांत व सुप्रसन्न होऊन काव्यविषयक कल्पनातरंगांत पूर्ण रमून जातें ! याप्रमाणे एका चंद्रामुळे देखील पृथ्वीवरील रात्रीस जर इतकें रमणीयत्व येतें, तर पांच चंद्रांमुळें गुरूवरील लोकांना रात्र किती रमणीय वाटत असेल आणि त्यांच्या चित्तवृत्ति किती आनंदित होत असतील ! A