पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुरु. १४३ अगोदर पुष्कळ दिवस वर्तवितां येतात. सुमारे दोनशे वर्षां- पूर्वी जेव्हां ज्योतिषी गणित करून या गुरूच्या चंद्रांच्या ग्रहणांचा काळ प्रथम वर्तवूं लागले, तेव्हां त्यांना असें आढ- ळून आलें कीं, ग्रहणांची पूर्वी वर्तविलेली वेळ आणि खरोखर ग्रहणें दृष्टीस पडण्याची वेळ हीं बरोबर जुळत नाहींत. कधीं ग्रहणें सुमारें १९।१६ मिनिटें लवकर लागतात व कधीं १५।१६ मिनिटें उशिरां लागतात. हा फरक कां होतो यावि- षयीं विचार करितां, १७ व्या शतकांतील रोमर नांवाच्या एका बुद्धिवान् ज्योतिष्याच्या असे लक्षांत आलें कीं, प्रका- शास कांहीं तरी गति असावी, व त्यामुळेच हा फरक पडत असावा. पुढें याविषयीं अधिक शोध करून गणितशास्त्राच्या साह्यानें विद्वान् ज्योतिष्यांनीं असें सिद्ध केलें कीं, प्रकाश एका सेकंदांत १ लक्ष ८६ हजार मैल चालतो. एका सेकं दांत १ लक्ष ८६ हजार मैल जाण्याचा हा केवढा प्रचंड वेग ! हा वेग इतका मोठा आहे कीं, प्रकाशाच्या प्रदक्षिणा एका सेकंदांत पृथ्वीभोंवतीं सात आठ होतील! आपला चंद्र फक्त २ लक्ष ४० हजार मैल दूर असल्यामुळे तेथून पृथ्वी- वर येऊन पोंचण्यास प्रकाशास दोन सेकंदें बस्स होतात ! सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास सुमारें आठ मिनिटें लागतात. ह्मणजे, जीं सूर्यकिरणें या क्षणी आपल्या डोळ्यांत शिरतात, तीं सूर्यावरून आठ मिनिटांपूर्वी निघालीं होतीं किंवा आप-