पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ अंतरिक्षांतील चमत्कार. चंद्रांवर लोकवस्ती असावी, असें कांहीं लोक अनुमान करि- तात. असें जर असेल, तर गुरूच्या चंद्रांवरील लोकांस किती मौज पाहण्यास सांपडत असेल ! गुरूचा महाप्रचंड आकार, त्याचे वरचेवर निरनिराळ्या रंगांचे दिसणारे ढगांचे आडवे पट्टे, अद्याप कदाचित् उष्ण असलेला गुरूचा आंतील भाग, हीं सर्व गुरूच्या चंद्रांवरून स्पष्टपणें पाहण्यास सांपडत अस तील ! आणि याशिवाय त्या चंद्रांवरील लोकांस परस्परांच्या वसतिस्थानांचेहि चमत्कार दृष्टीस पडत असतील! या अद्भुत देखाव्यांची यत्किंचित् तरी कल्पना पृथ्वीवरील लोकांस होईल काय ? आपल्या येथें पृथ्वीवर चंद्रामुळें जशीं चंद्रग्रहणें व सूर्यग्रहणे झालेलीं कधीं कधीं दृष्टीस पडतात, तशीं चंद्रग्रहणें व सूर्यग्रहणें गुरूवरहि होत असतात. गुरूला पांच चंद्र असल्यामुळे आणि गुरूची व त्यांची फिरण्याची गतीहि फार जलद असल्यामुळे, हीं ग्रहणें गुरूवर फार वरचेवर घडून येतात. एखादें दुसरें सूर्य- ग्रहण नाहीं, किंवा दोन तीन चंद्रग्रहणें नाहींत, असा एकहि दिवस गुरूवरील लोकांना जात नाहीं ! गुरूच्या चंद्रांमुळे होणाऱ्या ग्रहणांवरून एका मोठ्या सुंदर शास्त्रीय गोष्टीचा शोध लागला. गुरूच्या चंद्रांचे गमनमार्ग व त्यांची गति हीं इतक्या सूक्ष्मपणें समजण्यांत आलीं आहेत कीं, त्यांच्या ग्रहणांच्या वेळा गणितानें