पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुरु. १४१ णींतून पाहत असतां प्रोफेसर वर्नर्ड यांना हा पांचवा चंद्र दिसला. हा नवीन सांपडलेला गुरूचा चंद्र सर्वांत लहान आहे. याचा व्यास १०० मैल आहे व याचें गुरूपासून अंतर सु- मारें ११२५०० मैल आहे. गुरूच्या पांच चंद्रांपैकी चव- था चंद्र सर्वांत मोठा आहे. या चवथ्या चंद्राचा व्यास ३५९६ मैल आहे. ह्मणजे हा चंद्र बुधग्रहापेक्षांहि मोठा आहे ! गुरूचा सर्वांत शेवटला पांचवा चंद्र गुरूपासून ११ लक्ष ८९ हजार मैल अंतरावर आहे. गुरूच्या सर्व चंद्रांची गुरूभोंवतीं फिरण्याची गति फार जलद आहे. गुरूभोंवतीं एक फेरा करण्यास पहिल्या चंद्रास सुमारें १२ तास, दुस- व्यास १ दिवस १८ तास, तिसन्यास ३ दिवस १३ तास, चवथ्यास सुमारे ७ दिवस ३ तास, आणि पांचव्यास १६ दिवस १५ तास लागतात. गुरूच्या पहिल्या चंद्रावरून गुरूचा आकार फारच प्रचंड दिसत असेल! गुरूच्या दुसऱ्या व तिसऱ्या चंद्रांवरून देखील गुरूचा आकार बराच मोठा दिसत असावा असें वाटतें. आपणांस आपला चंद्र जेवढा दिसतो त्याच्या सुमारें १००० पट मोठा गुरूचा आकार त्याच्या चंद्रांवरील लोकांस – अर्थात् तेथें लोक असतील तर - दिसत असेल ! - O गुरूवर जरी कदाचित् आज प्राणी नसले, तरी गुरूच्या