पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० अंतरिक्षांतील चमत्कार. पृथ्वीसारखा थंड झाला ह्मणजे तेथें या मेघांचे मोठे महासा- गर होतील आणि नंतर वनस्पति व प्राणी यांची वसति होईल असें अनुमान करितात. तथापि यावरून असें मात्र समजूं नये कीं, आज गुरूवर कोणत्याहि प्रकारच्या प्राण्यांची वसति नाहीं असें खात्रीपूर्वक सांगतां येईल. कारण, आजच्या गुरूच्या स्थितीला योग्य परंतु पृथ्वीवरील प्राण्यांहून अगदींच भिन्न प्रकारचे असे प्राणी तेथें नसतील असें कोण ह्मणेल ? पृथ्वीवरील हल्लींच्या प्राण्यांप्रमाणे प्राणी गुरूवर राहूं शकणार नाहींत, इतकेंच अनुमान गुरूची आजची स्थिति पाहून आपणांस करितां येतें हें ध्यानांत ठेविले पाहिजे. पृथ्वीला जसा एक चंद्र आहे किंवा मंगळाला जसे दोन चंद्र आहेत, तसे पांच चंद्र गुरूला आहेत. गुरूचे चार चंद्र साधारण दुर्बिणींतून देखील दिसतात. परंतु गुरूचा पांचवा चंद्र दिसण्यास चांगलीच दुर्बीण पाहिजे. कारण, हा चंद्र सर्व चंद्रांत गुरूच्या फार जवळ आहे व याचा आकारहि फार लहान आहे. या लहान चंद्राचा शोध नुक्ताच (सन १८९२ सालीं) लागला. गुरूचे बाकीचे चार चंद्र दुर्बिणीची युक्ति निघाल्या दिवसापासून सर्व ज्योतिष्यांस माहीत झालेले आहेत. परंतु सन १८९२ सालापर्यंत गुरूला आणखी एखादा चंद्र असावा असे कोणासहि वाटले नव्हतें. सन १८९२ च्या सप्टेंबर महिन्यांत प्रसिद्ध लिक् येथील दुर्बि