पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुरु. " करून विद्वान् ज्योतिष्यांनीं काढिले आहे. तेव्हां पृथ्वीवरील मेघांपेक्षां पुष्कळ व मोठे असे गुरूवरील मेघ सूर्याच्या उष्णते- पासून होतात असें ह्मणतां येत नाहीं. ह्मणून दुसरें कांहीं तरी कारण असावें हें उघड दिसतें. आणि तें कारण या ग्रहाच्या अंगची आंतील उष्णता हेंच असले पाहिजे, दुसरे असूं शक- णार नाहीं असें अनुमान करावें लागतें. 'सूर्य' व 'पृथ्वी आणि चंद्र ' या दोन भागांत आह्मीं मांगें सांगितले आहेच कीं, पूर्वी सूर्य, पृथ्वी वगैरे सूर्यमालेतील सर्व पदार्थ आतांपेक्षां अत्यंत उष्ण होते आणि हे सर्व हळू हळू निवत चालले आहेत; यास्तव चंद्र हा पृथ्वीपेक्षां लहान असल्यामुळे आज निवून अगदीं थंडगार झाला आहे. लहान पदार्थ मोठ्या पदार्थापेक्षां लवकर निवतो हा अनुभव सर्वांस आहेच; त्याप्र- माणें गुरु हा ग्रह पृथ्वीपेक्षां फार मोठा असल्यामुळे तो आजला पृथ्वीइतका निवून थंड झालेला नाहीं. यावरून हें स्पष्ट होतें कीं, कित्येक युगांचे पूर्वी पृथ्वी ज्या उष्ण स्थितींत होती ती स्थिति आज गुरूची आहे. गुरूवर अद्यापि स्वतःची अंगची उष्णता असल्यामुळे, त्याचा पृष्ठभाग देखील पृथ्वीसारखा घट्ट झालेला नसून प्रवा- हरूपी आहे. या अंगचे उष्णतेमुळे गुरूचे पृष्ठभागावर पाणी राहत नाहीं. आणि ह्मणून तेथें मोठमोठे जाड ढगांचे थर दृष्टीस पडतात. पुढे कित्येक युगांनीं गुरु निवून आपल्या