पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. फक्त ३०९ पट अधिक आहे. असें कां असावें याविषयीं विचार करितां असें समजून येतें कीं, गुरूवरील पदार्थ पृथ्वीव रील पदार्थांच्या चतुर्थांशाइतके हलके आहेत. मेघ आकारानें जरी मोठे असतात, तरी ते हलके असल्यामुळे त्यांचें वजन फार कमी असतें आणि ह्मणूनच ते हवेंत तरंगतात, असा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. तेव्हां हें उघडच आहे कीं, गुरूला जो एवढा मोठा आकार आला आहे, तो त्याच्यासभोंवतीं जें मेघांच्या जाड थरांचें वेष्टन आहे, त्यामुळे आला आहे. आतां गुरूवर हे इतके मेघांचे जाड थर कशानें उत्पन्न होतात, हा प्रश्न आला. आपल्या पृथ्वीवर सूर्याच्या उष्णतेनें समुद्रांतील पाण्याची वाफ उत्पन्न होऊन ती हवेंत वर जाते आणि तेथें त्या वाफेचे मेघ बनतात. मेघ उत्पन्न होण्यास उष्णता लागते व उष्णतेशिवाय मेघ व्हावयाचे नाहींत हे उघड आहे. मग गुरूवर इतके मोठे आणि जाड मेघांचे थर होण्यास किती तरी उष्णता पाहिजे ? ही इतकी उष्णता गुरूवर येते कोठून? सूर्यापासून गुरूचें अंतर पाहिले तर, सूर्यापासून पृथ्वीचें जें अंतर आहे त्याच्या ५ पटींहून तें अधिक आहे. यास्तव, सूर्यापासून गुरूला जी उष्णता मिळते, ती आपणांस जी उष्णता मिळते त्यापेक्षां अर्थात् कमी असली पाहिजे. पृथ्वीला सूर्यापासून जी उष्णता मिळते तिच्या २७ व्या हिश्याइतकी उष्णता गुरूला सूर्यापासून मिळते, असें गणित