पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुरु. १३७ आणि गुरू व पृथ्वी यांच्यामधील अंतर ४० कोटि मैलां- पर्यंत येतें ! दुर्बिणींतून पाहिले असतां गुरूच्या विवावर आडवे पट्टे दिसतात. दोन चार मोठे पट्टे असतात; आणि कधीं कधीं दहा बारापर्यंत सुद्धां लहान पट्टे पाहण्यांत येतात. यावरून हे पट्टे नेहमीं बदलतात आणि कमी जास्ती होतात असे समजून आले आहे. या पट्यांचा रंग काळसर आहे; परंतु सूर्याच्या प्रकाशानें हे सतेज दिसतात. दुर्बिणीं- तून दिसणारे गुरूवरील पट्टे २६ वे आकृतींत दाखविले आहेत. हे पट्टे गुरूवरील वातावरणांतील मेघ आहेत असें ह्मणतात. गुरूच्या विवावर कधीं कधीं डाग पाहण्यांत येतात. हे डाग पट्टयांप्रमाणे वरचेवर वदलून नाहींसे होत नाहींत. अलीकडे सन १८७८ सालापासून एक मोठा तांबडा डाग गुरूच्या विवावर पाहण्यांत येत आहे. हा डाग सन १८७८ सालाच्या पूर्वी नव्हता आणि अलीकडेसच दिसूं लागला आहे. या डागाचे उत्पत्तीविषयीं आणि स्थितीविषयीं ज्योतिषी लोकांचा अद्याप कांहींच निर्णय ठरला नाहीं. आकारानें गुरु आपल्या पृथ्वीच्या १२८० पट मोठा आहे, हें वर सांगितलें आहेच. तेव्हां, गुरूवरील पदार्थ पृथ्वीवरील पदार्थांप्रमाणें जड असतील, तर गुरूचें वजनहि पृथ्वीच्या वजनाच्या १२८० पट पाहिजे. परंतु वास्तविक पाहिलें तर असे दिसून येतें कीं, वजनांत गुरु पृथ्वीच्या