पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतरिक्षांतील चमत्कार. रात्र मिळून एक दिवस २४ तासांचा व गुरूवरील अहो- रात्र मिळून एक दिवस फक्त १० तासांचा आहे! पण गुरूचें एक वर्ष आपल्या बारा वर्षांएवढे असल्यामुळे आपण ज्याप्रमाणे ३६५ दिवसांचें एक वर्ष मोजितों, त्याप्रमाणें गुरूवरील लोक १०४१५ दिवसांचें एक वर्ष मोजीत अस तील ! याप्रमाणें गुरूवरील लोकांचे तास, दिवस, व वर्ष हीं सर्वच चमत्कारिक असली पाहिजेत! आणि त्याप्रमाणें त्या लोकांची राहण्याची तहा व एकंदर जीवितक्रमहि फारच विलक्षण असला पाहिजे ! गुरु आपल्या आंसावर इतका जलद फिरतो कीं, त्याच्या गतीचा वेग पृथ्वीच्या गतीच्या २७ पट मोठा आहे ! गुरु इतक्या मोठ्या वेगानें स्वतःभोवती फिरत अस ल्यामुळे ध्रुवांकडे तो फारच चपटा होऊन मध्यभागी फुग- लेला दिसतो आणि याचमुळे त्याच्यावरील पट्टे आडवे दिसतात. नुसत्या डोळ्यांनी पाहिले असतां गुरु पहिल्या प्रतीच्या तायाइतका तेजस्वी दिसतो. या ग्रहाचें तेज शुक्राच्या तेजा- पेक्षां किंचित् कमी आहे. शुक्रापेक्षां शेंकडोंपट मोठा असून गुरु आपणांस शुक्रापेक्षा कमी तेजस्वी दिसतो, हें जरा चमत्कारिक वाटतें खरें; पण याचें कारण उघडच आहे कीं, शुक्र व पृथ्वी यांच्यामध्यें अंतर सुमारें ३ कोटि मैल आहे